ladki bahini yojna महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो. यावेळी एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाचवेळी दिला जाणार आहे, त्यामुळे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्र ३००० रुपये येणार आहेत.
🧐 कधी मिळणार एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील हे सांगितले आहे. लाडक्या बहिणींनी आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा सवाल केला आहे. एप्रिल महिन्याचा हप्त्याला काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा झाला. परंतु ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, ३००० रुपये एकदाच खात्यावर जमा होणार आहेत.
💸 योजनेचे पैसे खात्यात आले की नाही, कसे समजायचे?
1️⃣ तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
2️⃣ तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
3️⃣ तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.
4️⃣ तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते तपासा.
- लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार!
- UIIC Apprentice Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 145 जागांसाठी भरती
- माली / चपरासी, प्रधानध्यापिका, अध्यापिका, आया. पदांसाठी पदभरती 2025
- दहावी पास वरून निघाली वाहनचालक पदाची भरती | भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध…
- या 2795 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025